कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्ग अध्ययन – अध्यापन सुरू होणेबाबत अनिश्चितता असलेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पुढील शैक्षणिक रूपरेषा ठरवण्यासबंधी आज १४ जून रोजी शैक्षणिक सह विचार सभा आयोजित केली होती.
या सहविचारसभेमध्ये कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मा.मल्लिनाथ कलशेट्टी साहेब यांनी येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये विध्यार्थ्यांना ऑंनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू करणेसाठी निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथे तंत्रस्नेही शिक्षक, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचेशी तसेच मोबाईल फोनवरून राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांचे बरोबर चर्चा केली. तसेच त्यांनी अन्य जिल्हयातील तंत्र स्नेही शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ यांचीही मते जाणून घेतली.
या बैठकीमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात शासनाच्या दीक्षा अँपबरोबर स्वनिर्मित व्हिडीओ वापरून अध्यापन केले जावे, असे त्यांनी आवाहन केले. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतील शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने इयत्तेनुसार स्वनिर्मित विविध शैक्षणिक व्हिडिओ बनवून विद्यार्थी व पालक यांच्या पर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच दीक्षा अँपचा ही अधिकाधिक वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी प्रधासनाधिकारी एस. के. यादव, शै. पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई तसेच नचिकेत सरनाईक, युवराज एरुडकर, नेताजी फराकटे, संतोष बांबळे, प्रदीप पाटील, उत्तम वाईंगडे, रुपेश नाडेकर, प्रवीण भालेकर हे तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.