कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : सोमवारी रात्री भारतीय सीमेवरील लडाख येथील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैन्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय लष्करातील कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह जवळपास २० भारतीय जवान शहीद झाले.
ही बाब देशासाठी अत्यंत दुःखाची व संताप आणणारी असून चीनी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते. असे वक्तव्य महापौर निलोफोर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले.
त्याचप्रमाणे भारत सरकारने चीनमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालून मोठ्या उत्पादनासह आगदी रोजच्या वापरातील चीनी बनावटीच्या वस्तूंचे उत्पादन आपल्याच देशामध्ये होण्याकरिता स्वदेशी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देऊन या वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्याही प्रकारचे कर आकारू नयेत, ज्यामुळे स्वदेशी उत्पादनाला चांगले दिवस येऊन अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. असेही मत त्यांनी पत्रकाद्वारे मांडले व भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.