Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भारतीय सीमेवरील गलवान खो-यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एकुण २० जवान शहीद झाले. एम.आय.एम पक्षाकडून सर्वप्रथम शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली. तसेच या हल्याच्या निषेर्धात कोल्हापूर मध्ये ऐतिहासिक बिंदू चौक येथे चीन विरोधात घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान एम.आय.एम पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे अहवाहन केले.
त्यावेळी एम.आय.एम चे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख, एम.आय.एम शहर युवाअध्यक्ष सुहेल शेख, तौसीफ मौमीन, इस्तियाक नदाफ, सैफ धारवाडकर, फहिम वस्ता, जावेद शेख, इम्रान शेख, इजाज बागवान अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Share Now