Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील शास्त्री चौक येथील चौगुले शॉपिंग सेंटर समोर सकाळी रिक्षा पलटी होऊन अपघात झाला असून, या अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली.
गेले दोन वर्ष झाले येथील रस्ता झाला नसल्याने रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. रस्ता खराब असल्यामुळे इथे वारंवार अपघात होत असतात. रहदारी असणाऱ्या या रस्त्याचे काम होत नसल्यामुळे स्थानिक नागरीक ही त्रस्त झाले आहेत.
कर्नाटकातून म्हैशाळ कृष्णा घाट इथून येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे एखादा मोठा अपघात होण्याआधी हा रस्ता दुरुस्त करून व्हावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
Share Now