राधानगरी धरणातून १९०८ तर कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 22 Second

       १७ बंधारे पाण्याखाली

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ असा एकूण १९०८ क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे.
कासारी नदीवरील- यवलूज. वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील – सिध्दनेर्ली व दत्तवाड. वेदगंगा नदीवरील वाघापूर असे एकूण १७ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३४.३७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ४४.८९४ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४४.२० दलघमी, वारणा ३७९.४९ दलघमी, दूधगंगा २६०.८६ दलघमी, कासारी ३०.१६ दलघमी, कडवी ३०.३५ दलघमी, कुंभी ३२.३९ दलघमी, पाटगाव ३४.८८ दलघमी, चिकोत्रा १६.३९ दलघमी, चित्री १३.३८ दलघमी, जंगमहट्टी ८.०५ दलघमी, घटप्रभा ३९.८४ दलघमी, जांबरे ८.०८ दलघमी, कोदे (ल पा) ४.२७ दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २३.११ फूट, सुर्वे २३ फूट, रुई ५३ फूट, इचलकरंजी ५०.६ फूट, तेरवाड ४७.६ फूट, शिरोळ ३७ फूट, नृसिंहवाडी ३५ फूट, राजापूर २४.९ फूट तर नजीकच्या सांगली १०.३ फूट व अंकली १४.५ फूट अशी आहे.

 

  पाऊस/तालुकानिहाय 

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ३९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

 

जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले-२.१३ एकूण १०१.५० मिमी, शिरोळ- ०.२९ एकूण ६९.८६ मिमी, पन्हाळा- १५.४३ एकूण ३४१.४३ मिमी, शाहुवाडी- २५.३८ मिमी एकूण ४४६.८३ मिमी, राधानगरी- १७.८३ मिमी एकूण ४५६.१७ मिमी, गगनबावडा- ३९ मिमी एकूण १०१७.५० मिमी, करवीर – ६.९ एकूण ३०७.९१ मिमी, कागल- ११.१४ एकूण ३३४.१४ मिमी, गडहिंग्लज-२.७१ एकूण १९९ मिमी, भुदरगड- ५.६० एकूण ३७२.६० मिमी, आजरा- २३.२५ मिमी एकूण ४२९ मिमी, चंदगड- १८.५० मिमी एकूण ४७३.६७ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *