कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घेतला “हा” निर्णय

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तथा उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात कोल्हापूर जिल्हा कारागृहातील १६२ कैद्यांना जामीनावर सोडण्यात आले असून कोरोना प्रतिबंधासाठी ही कार्यवाही करण्यात आली.

कोरोनाचा कारागृहात प्रसार होवू नये व कैद्यांना लागण होवू नये, माणून सुप्रिम कोटाने ०१/२०२० क्रमाकाच्या स्यूजो मोटो रिट पिटीशन मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात उच्चस्तर शक्ती प्रदत्त समिती गठित केली होती . उच्च न्यायालयाकडून कारागृहामध्ये असलेले बंदी , कच्चे बंदीवान यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्याचे आदेश प्राप्त झाले .

Advertisements

त्यानंतर जिल्हा कारागृह अधिक्षक यांनी मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीशसो व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , कोल्हापूर यांच्या सोबत बैठक घेतली होती या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बंदिवानाची यादी तयार करण्यात आली होती त्यात प्रथमतः सात वर्षाच्या आत शिक्षा असलेल्या या बदीच्या याद्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमाने संबंधीत न्यायालयाकडे पाठविणेत आल्या होत्या त्यानंतर २३ मार्च ते २० जून २०२० दरम्यान एकूण ४३७ अर्ज अंतरिम जमानतीसाठी प्राप्त झाले होते . त्यापैकी १६२ आरोपींना अंतरिम जामीनावर मुक्तता करण्यात आलेली आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *