मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करून भारतीय जवानांना शहीद केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने चिनी राष्ट्राध्यक्ष व सैनिकांचा जोरदार निषेध करून चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
चीनी सैनिकांनी लडाख मधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करून २० जवानांना शहीद केले होते. त्याबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचाच भाग म्हणून आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने चीनी राष्ट्राध्यक्ष व चीनी सैनिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चीनी राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेचे व ध्वजाचे दहन करत जोडेमार आंदोलन केले.
यावेळी आमदार सुरेश (भाऊ) खाडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, उपमहापौर आनंदा देवमाने , विधानसभा संयोजक प्रा मोहन व्हनखंडे, नगरसेवक पांडूरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, माजी महापौर संगीता खोत, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, काका धामणे, उमेश पाटील, सचिन चौगुले, जयगौंड कोरे, ओंकार शुक्ल, शशीकांत वाघमोडे ,राजा देसाई, आण्णा रसाळ, गणेश चौगुले, महेश धयारे, विजय राठी, साजीदअली पठाण, खुदबुद्दीन काजी, शंकर ईसापुरे, सुर्यकांत शेंगणे, अभिरूप कांबळे,महिला आघाडीच्या ज्योती कांबळे, नंदा जोशी, रुपाली देसाई,यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, राजेंद्र नातू, व ग्रामीण अध्यक्ष शंकर पाटील यांनी केले.