Share Now
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : प्रभाग क्र ५९ नेहरु नगर मध्ये वाढलेल्या भटकी कुत्री यांचा नागरिकांना त्रास होत आहे या विरोधात आज या भागातील नागरिकांनी आवाज उठविला.
नेहरू नगर मध्ये महानगरपालिकेचे निर्बीजी केन्द्र प्रभाग क्र.५९ नेहरू नगर मध्ये आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये गेले ३ वर्ष सुरू आहे ही कुत्री सगळीकडून पकडून याच भागामध्ये सोडतात त्यामुळे इथल्या नागरिकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
इथे लहान मुले व दुचाकीवरून जाणाऱ्यांना जास्त धोका वाढला आहे.भागातील महिला ,जेष्ठ नागरिक व तरुण मंडळाच्या सदस्यांनी डॉक्टर विजय पाटील यांना निवेदन देऊन सर्व गैर प्रकारची माहिती उघडीस आणली .
यावेळी परिवहन समिती सदस्य प्रसाद उगवे , माजी परिवहन समिती सदस्य सयाजी आळवेकर, चारुदत्त रणदिवे, अमर ढेरे, अजित नलवडे व भागातील सर्व महिला व तरुण मुले उपस्थित होते.
Share Now