मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : कोरोनाच्या संकट -काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अव्यहातपणे व निस्वार्थी भावनेने काम करत अस -लेल्या आशा स्वयंसेविका व सर्व बहे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बद्दल एक कृतज्ञता म्हणून व त्यांचे फक्त शब्दात आभार न मानता त्यांना भविष्यकाळा -मध्ये काम करताना उपयोगी येतील अश्या वस्तु भेट म्हणून देऊन आज ग्रामपंचायती तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच छायाताई पाटील यांच्यातर्फे आशा स्वयंसेविकांना संरक्षक कोट प्रदान करण्यात आले तसेच बहे ग्रामपंचायती मार्फत सर्व कर्मचारी वर्गाला रेनकोट,छत्री तसेच बॅटरीचे वाटप करण्यात आले.
यावेळी नुतन उपसरपंच सुवर्णाताई पाटील, राजाराम बापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील(तात्या), प्रा. शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोजकुमार पाटील, शिवाजीराव पाटील(बापु), रोहित तोरस्कार, बबनराव शिरतोडे, प्रवीण फल्ले, रुपाली देशमुख,
विमल थोरात तसेच राजाराम थोरात, हेमंत सुर्यगंध, ग्रामसेवक अशोक खोत, तलाठी सुभाष पाटील, आशा स्वयंसेविका व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.