मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलै महिन्यात तर कोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी अधिक दक्षतेने काम करा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
गडहिंग्लजमध्ये उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी मशीन व प्रयोगशाळेचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या मशीनमध्ये दर तासाला दोन स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. या मशीन तपासणीत निगेटिव्ह आलेल्यांना संस्थात्मक कॉरंटाईन करणे सोपे जाईल व पॉझिटिव्ह आलेल्यांवर तातडीने पुढील उपचार करता येईल. यामुळे वाढणारा संसर्ग रोखता येईल.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी- पाटील, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, वैद्यकीय अधीक्षक दिलीप अंबोळे, डॉ.यु.जी. कुंभार, डॉ.वर्षा पाटोळे, डॉ.स्वाती इंगवले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सुरेश कोंळकी, तहसीलदार दिनेश पारगे आदी प्रमुख उपस्थित होते.
गडहिंग्लजच्या आकड्याने माझी झोपच उडाली.
गडहिंग्लजमध्ये कोरोना बाधितांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे , हे चिंताजनक आहे. हा आकडा ऐकून तर माझी झोपच उडाली.
त्यामुळे मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगबाबत कठोर कारवाई करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.