कोल्हापुरातील नाभिक समाजाला आमदार चंद्रकांत पाटील यांची साहित्यरूपी मदत

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 4 Second

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : तीन     महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवंचेनेत असलेल्या नाभिक व्यवसायिकांना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी साहित्यरूपी मदतीचा हात दिला आहे.

सँनिटायझर, अँपरन, मास्क, नँपकीन व हँडग्लोज असे आवश्यक साहीत्याचे कीट कोल्हापूर शहरातील १००० केस कर्तनालयात वितरीत करण्यात येणार आहे. आज खरी काॅर्नर येथील बार्बर जेंन्टस पार्लर याठिकाणी हे किट देऊन याची सुरवात करण्यात आली.

गेल्या तीन महिन्यांपासून नाभिक लोकांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे या लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत- दादा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही दुकाने उघडायला अखेर महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली. उद्या दि. २९ जून पासून राज्यातील सर्व केशकर्तनालय सुरू होणार आहेत.

केस कर्तनालय सुरू होत असताना सरकारने दुकानांवर अनेक निर्बंध लादले आहेत. दुकाने लगेच सुरु करत असताना हा आणखीन खर्च त्यांच्यावर बोजा असणार आहे. हा विचार करून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अशा दुकानदारांना साहित्यरूपी मदत करण्याचे ठरवले व त्याची अंमलबजावणी ही केली. आज प्रातिनिधिक स्वरूपात आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण, किशोर खराडे, सयाजी झुंजार, सतिश चव्हाण, दिपक खराडे, सचिन यादव, नारायण पोवार, विकी सुर्यवंशी, संतोष चव्हाण, गणेश जाधव, दिपक माने, वामन गवळी, संदीप शिंदे, दिलीप टिपूगडे, भाजपाचे अशोक देसाई, विजय आगरवाल, बाबा इंदूलकर, गायत्री राऊत, सिद्धेश्वर पिसे आदी उपस्थित होते.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *