Share Now
मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी महावितरण विभाग मिरज येथे मा. भीमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
झोपडपट्टी व मागासवर्गीय वस्त्या व इतर गोरगरीब जनतेचे वीजबिल माफ करण्यात यावे, असे निवेदन महावितरण कार्यालय मिरज विभाग येथे देण्यात आले, असून येत्या चार दिवसाच्या आत यावर निर्णय झाला नाही, तर आम्ही महावितरण कार्यालय मिरज समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी भिमराव कृष्णा बेंगलोरे ( राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मिरज शहर), सौ.जसप्रीत कौर (महिलाजिल्हा उपाध्यक्ष), मिरज शहर अध्यक्ष सौ वंदना चंदनशिवे, मिरज शहर उपाध्यक्ष मा. लखन लोंढे, मा. अल्ताफ पकाली मा. प्रशांत ढंग मा. शुभम कांबळे मा. लखन धोंगडे मा. दीपक सुतार सह आदी मान्यवर उपस्थित होते.
Share Now