शववाहिकेमध्ये शव ठेवल्यानंतर नातेवाईकांनाही शेववाहिकेला धक्का मारण्याची वेळ येते तेव्हा……..

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : मा. मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा यांच्यातर्फे भीक मांगो आंदोलन

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची शववाहिका वारंवार बंद पडत असून, सांगली मिरज आणि कुपवाड मधील जनतेच्या भावनेशी खेळ होत आहे. शववाहिकेमध्ये शव ठेवल्यानंतर नातेवाईकांनाही शेववाहिकेला धक्का मारण्याची वेळ येत असून तसेच मृतदेह खाजगी वाहनातून शववाहिका बंद असल्यामुळे घेऊन जाण्याची वेळ येत आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

Advertisements

मनपा प्रशासन कोट्यावधी रुपयांचे घनकचरा नाला स्वच्छता यासारख्या प्रकल्पात नियम व अटी धाब्यावर बसून प्रकल्प कोण करीत आहेत जनतेच्या मनात या प्रकल्पाबद्दल भ्रष्टाचाराचा वास येत असून मनपा प्रशासन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करायला मागेपुढे बघत नाही, दर पाच ते सहा वर्षांनी पदाधिकारी व अधिकारी स्वतः करण्यासाठी वाहने खरेदी करतात पण माणसाचा शेवट झाला की त्या अंत्ययात्रेसाठी शववाहिका दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी यांच्या हाताला लकवा मारतो काय? असे दिसून येते.

 

 

जनतेच्या भावनेशी मनपा प्रशासन खेळण्याचे काम करत असून, हे ताबडतोब बंद झाले पाहिजे  महापालिकेला शववाहिका दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंच जनतेकडून भीक मागून पैसे गोळा करीत आहे व जमा झालेली सर्व रक्कम युवामंच मनपा प्रशासनास देणार आहे. जनाची अथवा मनाची थोडी तरी लाज असेल, तर मनपा प्रशासनाने ताबडतोब शववाहिका सुस्थित करावी अथवा नवीन घ्यावी, लोकांच्या भावनेशी खेळण्याचा खेळ थांबवा अन्यथा मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या पेक्षाही उग्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

 

 

मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा अध्यक्ष आनंदा लेंगरे, युवा मंच कार्याध्यक्ष शीतल लोंढे, अविनाश जाधव, संजय पवार, शानुर शेख, शंकर जामदार, मयूर बांगर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *