Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भाजी मंडईमध्ये विनामास्क, हॅन्डग्लोज व सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे भाजी मंडई पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका अशा सुचना कपिलतीर्थ मार्केटची पाहणी करतांना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी भाजी मंडईतील व्यवसायिकांना केल्या.
महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी मंगळवारी उपमहापौर संजय मोहिते, गटनेते शारगंधर देशमुख व महापालिका अधिकारी यांच्या समवेत कपिलतीर्थ भाजी मंडईची पाहणी केली.
यावेळी महापौर आजरेकर म्हणाल्या, मार्केंटमध्ये भाजी विक्रेते विना मास्क, हॅन्डग्लोज भाजी विक्री करत असलेचे आढळत आहेत. भाजी मंडई हे कोरोनाचे हॉटस्पॉट मध्ये असलेने, याठिकाणी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे विक्रेंत्यांनी पालन करावे अन्यथा नाईलाजाने मार्केंट पुन्हा बंद करावी लागतील.
मित्र प्रेम मंडळासमोरील रिक्षा स्टॉपच्या परिसरातील प्रवेशद्वारात असलेले नारायणी दुकानाचे अतिक्रमण काढावे, याठिकाणी असलेले पार्किंग व्यवस्था सुरळीत करा. तसेच पार्किंगमध्ये मुख्य रस्तेवरुन जाणेसाठी खडीमुरमाचा रस्ता करा. याचबरोबर मार्केंटमध्ये दैनदीन स्वच्छता व औषध फवारणी करण्याच्या सुचनाही महापौरांनी मुख्य आरोग्य निरिक्षक जयंत पोवार यांना दिल्या.
यावेळी गटनेते शारगंधर देशमुख यांनी याठिकाणी विक्रींसाठी बसणारे व्यापारी, दुकानदार व भाजी विक्रेंते त्यांना नेमुन दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापली असलेचे निर्दशनास आणले. यावेळी देशमुख म्हणाले, येथे असलेल्या व्यापारी व विक्रेंत्याची संख्या, त्यांना नियमाप्रमाणे दिलेली जागा व प्रत्यक्षात वापर करीत असलेली जागा याची माहिती दयावी. प्रत्येकाला पट्टे मारुन दिले तर आणखीन रस्तेवरील विक्रेंते बसवता येतील. मार्केंटमध्ये धान्य व्यापारी व्यवसाय करत असलेल्या ठिकाणची उंची नियमाप्रमाणे करा.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक जयंत पोवार, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, आरोग्य निरिक्षक ऋषीकेश सरनाईक, मार्केट ऑफिसर राजेद्र पाटील, आश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते.