Getting your Trinity Audio player ready...
|
सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष व स्व. मदनभाऊ पाटील यांचे खंदे समर्थक संजय सुनके यांचा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांचे मार्गदर्शनाखाली जाहीर पक्ष प्रवेश केला.
“इथुन पुढील काळात पक्षाचे कामं तळागाळापर्यंत पोहोचवणार” असल्याचे संजय सुनके यांनी पक्ष प्रवेशावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिका गटनेते मैनुद्दीन बागवान, युवक शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्यांक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक-नगरसेविका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.