मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : इचलकरंजी नगरपरिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.
मा. राजू बोंद्रे सभापती शिक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे, प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष नेताजी बिरंजे, अँड.एस बी सावेकर, महासत्ताचे उपसंपादक बसवराज कोटगी, चंद्रकांत कदम ,निळकंठ गोसावी, सुवर्णा पवार, उमेश लाड ,जीवन पोतदार, रमेश धोत्रे, युवराज मगदूम, शैला गायकवाड, आशा घारगे, हसीना शेख आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शंकर पोवार यांनी केले. यामध्ये त्यांनी शाहू महाराज यांचे विचार व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली. निळकंठ गोसावी, सुवर्णा पवार यांनी शाळेविषयी शाहू महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे यांनी मनोगतामध्ये “शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपण सर्वांनी जपूया शाळेला चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न करूया”, असे विचार प्रकट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा राजू बोंद्रे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये . असे कार्य लोकराजा शाहू महाराज यांनी केले.
सूत्रसंचालन श्री पी.ए.पाटील व आभार प्रदर्शन सौ जाधव यु.पी. यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.