Share Now
Read Time:1 Minute, 3 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – दैनिक पुढारीचे सहाय्यक मुख्य प्रतिनिधी, पत्रकार अनिल देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई केरबा देशमुख यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या.
कलीकते नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर येथे त्या राहत होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग असायचा.
त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. करवीर तालुका मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील देशमुख आणि तलाठी कल्पना माने यांच्याही त्या मातोश्री होत. जलदान विधी रविवारी (दि.24) आहे.
Share Now