Share Now
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये , म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत असून, राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै पर्यंत वाढविला आहे.
सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार जे सांगली जिल्हा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत. अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास ३० जून पर्यंत देण्यात आले होते. लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे कामगारांना जारी करण्यात आलेल्या पासची मुदतही आता ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.
यामध्ये शासनातर्फे वेळोवेळी जारी करण्यात येत असले -ल्या सूचनांनुसार काही बदल झाल्यास कळविण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधि -कारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
Share Now