“रोटी फौंडेशन कोल्हापूर” यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : समाजात आज बऱ्याच संस्था गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. तरी सुद्धा काही असे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहचवू शकत नाही. अश्याच अत्यंत गरजु लोकां पर्यंत आपली मदत पोहचवण्यासाठी रोटी फौंडेशन कोल्हापूर या संस्थेने एक पाऊल पुढे टाकायचा निर्णय घेतला व अनेक संस्थाबरोबर आपण ही गरजु लोकांच्या पर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचा.

रोटी फौंडेशन कोल्हापूर मार्फत भविष्यात अन्न, वस्त्र, शैक्षणिक साहित्य, औषधें, आणि आर्थिक मदत जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम करण्यात येणार आहे.

Advertisements

कोव्हीड-१९ मुळे बरेच मजूर लोक घरी बसून आहेत आणि त्यांच्यावर भुकमारीची वेळ आली आहे. त्यापैकी हमाल लोक एक आहेत. गेले ४ महिने काम नाही ! घरी अन्न नाही! कमवण्याचे दुसरे कोणते साधन नाही ! म्हणून आज ३ जुलै रोजी रोटी फौंडेशन कोल्हापूर मार्फत १६ हमाल कुटुंबांना १ महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्यामध्ये तांदूळ, गहू, तूर डाळ, मुग डाळ, मसूर डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

दरम्यान यावेळी रोटी फौंडेशनचे संस्थापक इस्माइल जमादार, बबला शेठ, प्रा.शाहिद शेख,जावेद चिलीमत्तूर ,इम्रान चिलीमत्तूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *