कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना प्रादुर्भावाशी लढा देत असताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपल्या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्य खरेदी केले होते. त्याचा आज ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये डिजिटल थर्मामिटर, पल्स ऑक्सीमीटर, सक्शन मशिन, ऑक्सीजन सिलेंडर, डिफेब्युलेटर, सिरींज पंप, डिजिटल ईसीजी मशीन, एन ९५ मास्क, सॅनेटायझर, पीपीई किट, व्हिल चेअर, स्ट्रेचर ट्राली, बीपीॲपॅरेअर, मल्टी पॅरामॉनीटर, थर्मल स्कॅनर, बायोमेडीकल वेस्ट बकेट, सोडीयम हायपो सोल्युशन, मास्कचा समावेश आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.केम्पीं पाटील, प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार अमोल कदम, सभापती किर्तीताई देसाई, उपसभापती सुनिल निंबाळकर, सरपंच धनाजी खोत, वैद्यकीय अधिक्षक डॉ.भगवान डवरी, वैद्यकीय अधिकारी मिलिंद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ऐतनाळकर, गटविकास अधिकारी श्री.अजित देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल कुलकर्णी, डॉ.सविता शेट्टी, फार्मसिस्ट कोरे, संजय चिले, प्रसाद जंगम, एस.के.शिंदे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता.