कोल्हापूर (दिनेश चोरगे) : “कोविड-१९” चा प्रसार रोखण्याचे आव्हान कोरोना योध्दांनी स्वीकारले. त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपल्याला कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात आजपर्यंत यश आले आहे. या सर्व योध्दांनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून ते अभिनंदनास पात्र आहेत. या कोरोना योध्दांच्या निस्वार्थ सेवेसाठी, आम्ही त्यांना सलाम करतो, असे मत नगरसेवीका जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेज व तगारे हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक ६३ मधील कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरीटेजच्या अध्यक्षा शिल्पा देशपांडे होत्या.
नगरसेवीका सौ. जाधव यांच्या हस्ते प्रभागातील आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार केला. तसेच सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोज याचे वाटप करण्यात आले.
यावेळी क्लबच्या सेक्रटरी श्रध्दा वज्रमुखे, डॉ. अभिजीत तगारे, डॉ. शलाका तगारे, सोनाली महाडिक, वैशाली चौगुले, मुग्धा केसकर, गीता कदम, श्रेया गांधी, कवीता बेनाडे आदी उपस्थित होत्या.