महानगरपालिकेच्या वतीने ५१०५० रुपये दंड वसूल

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथकांची नेमणूक केली आहे. या पाच पथकाद्वारे बुधवार व गुरुवारी शहरामध्ये मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्या १५३ व्यक्तींवर कारवाई करुन रु.५१०५०/- चा दंड वसूल केला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील फळ व भाजी विक्रेते, व्यवसायिक आस्थापना यांनी मास्क व हॅन्डग्लोजचा सक्तीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर कायम मास्क/रुमाल वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग पाळणे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकणे, घाण न करणे आवश्यक आहे. याबाबत बुधवार दि.८ जुलै २०२० रोजी या आदेशाने उल्लंघन करणा-या १५० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्या कडून रक्कम रु. २५,४००/- इतका दंड वसून करण्यात आलेला आहे.

Advertisements

तसेच गुरुवार दि.९ जुलै २०२० रोजी आदेशाचे  उल्लंघन करणा-या १५३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्या कडून रक्कम रु. २५,६५०/- इतका दंड वसून करण्यात आलेला आहे.

या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांना नागरीक, भाजी विक्रेते, दुकानदार, फळ विक्रेते यांच्यावर येथून पुढे दंडात्मक कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी के.एम.टी कडील २०० कर्मचारी कोरोना योध्दा म्हणून प्रत्येक प्रभागात काम करत आहेत. तरी शहरातील नागरीकांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टंन्सचे पालन करावे,  हॅण्डग्लोज वापरावेत, सार्वजनिक ठिकाणे थुंकू नये, संचारबंदीचे पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *