Kolhapur: इस्टेट विभागाच्या वतीने जाहीर आवाहन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, महापालिका महासभा ठराव क्र.61 व महासभा ठराव क्र.10 ने महानगरपालिकेने कोल्हापूर शहरात जाहिरातीबाबत धोरण निश्चित केले आहे.  त्यामध्ये शहरातील दुकानांच्या दर्शनी भागावर दुकानांच्या नावांव्यतिरिक्त इतर कंपन्याची जाहीरात केली जाते.

त्याकरीता जाहिरात शुल्क प्रति चौ.फुटाप्रमाणे निश्चित करुन दिलेले आहे. याबाबत यापुर्वी जाहीर आवाहनाद्वारे जाहिरात शुल्क भरणेबाबत कळविले होते.  तथापी अद्यापही दुकानांच्या दर्शनी भागावर विनापरवाना जाहिराती (प्लेक्स्/एल.ई.डी.द्वारे) प्रदर्शित होत असल्यसाचे निर्दशणास येत आहे.  त्यामुळे दि.18 मार्च 2019 पासून असे विनापरवाना जारिहरात फलक/एल.ई.डी. हटविणेची कारवाई इस्टेट विभागाच्या मार्फत सुरु करणेत येणार आहे.

Advertisements

तरी संबंधीत दुकानदारांना आवाहन करण्यात येते की आपणे प्रदर्शित करत असलेल्या जाहिराती फलक/एल.ई.डी. करीता महापालिकेच्या शिवाजी मार्केट येथील इस्टेट विभागामध्ये संपर्क साधुन विहीत शुल्क भरावे. सदरची कारवाई टाळावी, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *