Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच ने वाढून आजअखेर ११ झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने ग्रामस्थांच्या भीतीमध्ये आणखी वाढ होत आहे. दरम्यान, गांधीनगरमधील रुग्ण संख्या स्थिर असून दोन रुग्ण पूर्वीच पॉझिटिव्ह आले आहेत.
वळीवडे येथील साई वसन शाह कॉलनीमधील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यापाऱ्याच्या पत्नी आणि मुलगीचा अहवालही पॉझिटिव्ह यापूर्वीच आला आहे. आज रविवारी एका महिला, दोन बालक व त्यांचे आई-वडील अशा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
शांतीप्रकाश कॉलनीत हे राहत होते. या परिसरामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. सरपंच अनिल पंढरे व ग्रामपंचायत सदस्य विक्रम मोहिते, भगवान पळसे कर्मचाऱ्यांसह औषध फवारणी करत आहेत. हा परिसर पूर्णपणे सील केला आहे. या परिसरातील सर्वांचीच वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
Share Now