कोल्हापूर. शिवाजी शिंगे : कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वृषाली व्ही. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.पंकज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या विषाणूपासुन सरंक्षणाकरीता जनजागृती शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृह, बाल कल्याण संकुल मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे करण्यात आले .
सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.पंकज देशपांडे व श्रीमती.एम.एस.निकम प्रमुख न्यायाधीश बाल न्यायमंडळ कोल्हापुर यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती.एम.एस.निकम , प्रमुख न्यायाधीश बाल न्यायमंडळ कोल्हापुर यांनी केले .
सदर कार्यक्रमामध्ये डॉ.प्रतिक राऊत ( एम एस . ) कोल्हापूर यांनी कोरोना विषाणू जनजागृती या विषयावर मार्गदर्शन करत, कोरोना या विषाणूची लक्षणे काय असतात, याबाबतची सविस्तर माहिती सांगितली. व कोरोना विषाणूपासुन दक्षता कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले .
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा.पंकज देशपांडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की , कोरोना विषाणुला रोखणेसाठी आपण दररोज सॅनिटायझर व मास्कचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे विद्यार्थ्यांना मास्क वाटप करणेत आले व सदर संस्थेची पहाणी केली असता सॅनिटायझेशनची व्यवस्था उत्तमरित्या करणेत आली असून, सोशल डिस्टन्सचेही काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांस बालकल्याण संकुल येथील ४७ विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये सुत्रसंचालन बाल कल्याण संकूल संस्था परिविक्षा अधिकारी श्री. सचिन माने यांनी केले व मान्यवरांचे आभार प्रदर्शन सौ.गुजर मॅडम अधिक्षक बाल कल्याण संकूल कोल्हापूर यांनी मानले . त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सहा.अधिक्षक श्री. राजीव माने , बाळासाहेब सुपेरकर हे उपस्थित होते.