यापुढे कोणत्याही नवविवाहितेला असा क्रूर प्रसंग येऊ नये, म्हणत बापाने केली खुन्याच्या कठोर शिक्षाची मागणी.

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : पंढरपूर (जि. सोलापूर) येथील आकाश पवार याने पत्नी निकिताचा कोयत्याने गळा चिरून अमानुषपणे खून केला असून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी निकिताचे वडील अंकुश आप्पा धोत्रे (रा. गडमुडशिंगी, जि. कोल्हापूर) यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुधाकर वारके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

चार महिन्यापूर्वी निकिताचा विवाह पंढरपूर येथील कुंभार गल्लीतील आकाश पवार याच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर माहेरहून पैसे घेऊन ये, या कारणासाठी तिचा मानसिक, शारीरिक छळ होऊ लागला. नवीन असल्याने आम्ही कुठेही तक्रार केली नाही.

Advertisements

दहा जुलै रोजी आकाशने कोयत्याने गळा चिरून निकिताचा अमानुष खून केला. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत असे क्रूर कृत्य अशोभनीय आहे. यापुढे कोणत्याही नवविवाहितेला असा क्रूर प्रसंग येऊ नये, म्हणून निकिताच्या खुनाचा तपास होऊन आकाश पवारला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी निकिताचे वडील अंकुश धोत्रे यांनी निवेदनाद्वारे डॉ. वारके यांच्याकडे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *