सांगली प्रतिनिधी शरद गाडे : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम प्रचार प्रसिध्दी चित्र रथास खासदार संजय पाटील यांच्याहस्ते तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तालुका कृषी अधिकारी संभाजी पटकुरे यांच्या उपस्थित पार पडला. या चित्ररथाच्या माध्यमातून सपूर्ण सांगली जिल्ह्यात पिकविमा योजनेबाबत सविस्तर प्रचार प्रसिध्दी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत मार्गदर्शन केले.
