राज्यातील वृद्ध कलावंतांना लवकरच मिळणार थकीत मानधनाची रक्कम : सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 54 Second

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही, मात्र कला हीच त्यांची उपजीविका असल्याने कलावंतांचे वय झाल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात.
कलावंत हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. प्रगतिशील समाज हा समाजातील कलावंतामुळे ओळखला जातो. समाजातून निर्माण झालेला कलावंत अनेकवेळा सामाजिक प्रबोधनाद्वारे लोकांना दिशा दाखविण्याचे सुद्धा काम करत असतो. कलावंतांप्रति शासन त्यांच्या कल्याणासाठी व सहायता करण्यासाठी कटिबद्ध आहे.

राज्यात कोविडमुळे उद्भवलेल्या संकटात कलावंताच्या थकीत मानधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. वृद्ध कलावंतांच्या अनेक शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन व्यथा मांडली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे हा थकित मानधन देण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतला आहे असे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील दोन महिन्यांचे थकीत मानधन येत्या आठवड्यात कलावंतांच्या खात्यात जमा होणार आहे.

कोविड काळात आता जवळपास २८८०० कलावंतांना यामुळे दिलासा मिळणार असून, याबाबत महाविकास आघाडी सरकारचे कलावंत संघटनेचे पदाधिकारी व अनेक वृद्ध कलावंतांनी आभार मानले आहेत.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *