मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू असून काही ठिकाणी अनलॉक ची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
या सर्वांच्या जाणिवेतून भुदरगड प्रतिष्ठानच्या संकल्पनेवर अध्यक्ष दयानंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे होत असलेले रक्तदान शिबीर या कोरोना काळात रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सोशल डिस्टनसिंगचे पालन करत विठ्ठल मंदिर कडगाव ता.भुदरगड येथे घेण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे.
या एकदिवसीय रक्तदान शिबिरास पंचायत समितीचे आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून ” आपण सर्वांनीच या शिबीरात सोशल डिस्टनसिंगचे पालन करत, मास्कचा वापर करून सहभागी होत रक्तदान करून या” सामाजिक कार्याला सहकार्य करा असे आव्हान युवा पत्रकार संघाचे भुदरगड तालुका अध्यक्ष समीर वजीर मकानदार यांनी केले आहे.
रक्त आपल्या शरीराकरता किती उपयोगी आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरं जाव लागतं, कित्येकवेळा तर मनुष्याचा मृत्यु देखील ओढवतो. एखाद्या अपघातात मनुष्य जखमी झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते.
ही कमतरता भरून काढण्याकरता मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज भासते, अशा वेळी एका व्यक्तीच्या शरीरातुन रक्त काढुन दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते. रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष दयानंद भोईटे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
रक्तदान शिबिरमध्ये जीवनधारा रक्तपेढी कोल्हापूर सहभागी होणार असून प्रत्येक रक्तदात्यास पावसाळी छत्री भेट देणार आहेत.
तरी या शिबिरात भुदरगड तालुक्यातील सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावावा, असे रक्तपेढी प्रमुख प्रसाद बिंदगे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.