कोल्हापूर जिल्ह्यातील १ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद

 कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-१९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून, आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *