गांधीनगर परिसरात कोरोनाचा कहर… रुग्णसंख्या पोहोचली १३८ वर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असून रविवार अखेर रुग्णसंख्या १३८ वर पोहोचली आहे.

गांधीनगर, वळिवडे येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान गांधीनगर मेनरोडवरील वळीवडेसह पाच गावांच्या सीमा यापूर्वीच सील केल्या आहेत.

Advertisements

 रविवारी गांधीनगरमध्ये एका तर वळीवडे येथे सहा रुग्णांची भर पडली. वळीवडे येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामपंचायत प्रशासन औषध फवारणीसह , प्रतिबंधक उपाय योजना करत आहे. उचगाव व गांधीनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी हद्दीत रविवारी प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे.
चिंचवाडमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आणखी एका महिला रुग्णाची भर पडली आहे. तिच्या सहवासातील चार जणांना तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवल्याचे सरपंच सुदर्शन उपाध्ये यांनी सांगितले.

गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची रविवारअखेरची संख्या अशी : गांधीनगर (६०), वळिवडे (५०), उचगाव (१७), चिंचवाड (५) आणि गडमुडशिंगी (६). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३८ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *