जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जाहीर केले सुधारित आदेश

कोल्हापूर शिवाजी शिंगे : जिल्ह्यात उद्यापासून पासून  ७ दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. त्या बरोबर  दूध संकलन व वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही. या बाबतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला आहे.

जिल्हादंडाधिकारी यांनी आज जाहीर केलेल्या सुधारित आदेशानुसार सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील तसेच बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे सुरु राहतील.
  दूध संकलन व वाहतूक सुरु राहील (वेळेची मर्यादा नाही) आणि ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खासगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
  या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *