असे पुढारी आमचे वैरी. : लेखक तानाजी सखाराम कांबळे.

0 0

Share Now

Read Time:11 Minute, 15 Second

गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड  करू  शकत नाही. डॉ.  बी. आर. आंबेडकर यांनी, एक मोठा आणि मौलिक असा सल्ला, भारत देशाला दिला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये, डॉक्टर आंबेडकर यांचे दलित वगळता अन्य समाजाला नेतृत्व खपत व  रुचत नाही हे वास्तव आहे.

 मात्र तरीदेखील त्यांनी या देशाला, दिलेले” भारतीय संविधान”

सामाजिक समता बंधुता आणि एकता याचे प्रतीक आहे. पुढारलेल्या देशांमध्ये” कथित” विचाराला थारा दिला जात नाही” तर, वास्तवाला सोबत घेऊन पुढे गेले जाते. मात्र, भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये” तथाकथित”विचारांना

 सोबत घेऊन, ते जिवंत ठेवून त्यांना धार्मिक सामाजिक व जातीय रंग देऊन त्याच्यावरती तहयात राजकीय-सामाजिक पोळी भाजली जाते. सात रंगाच्या या चळवळी वरती, प्रकाश टाकला असता, त्याला निळी चळवळ देखील अपवाद ठरले आहे,असे म्हणणे अवघड आहे. गुलामगिरीला कोणत्याही प्रकारचा जात-धर्म नसतो.असतो तो फक्त एक आभासी जीवनातील घटक, वगळता वैचारिक ‘प्रगल्भता’ ही नष्ट झालेली असते. खरं म्हटलं तर गुलाम तो असतो जो, कथित विचारांच्या प्रभावाखाली जगत असतो. बहुतांशवेळा तो जात,धर्म, रूढी, व परंपरा यांच्या मानसिकतेमध्ये गुरफटलेला असतो. यामुळे तो अनेक पिढ्या न्यायापासून प्रलंबित ठेवला जातो. किंबहुना ‘न्याय’ ही नावाची काय चीज आहे, यापासून तो नेहमीच “वंचित” राहिला जातो. जात,नाही ती जात!या विचारांच्या पलीकडे या देशातील साहित्य, संस्कृती, विचारधारा खरंतर रुजली गेली पाहिजे. याही पलीकडे जाऊन, व्यक्ती समाज संस्था समुदाय आणि घटक, यांना एका विचाराच्या सात्विक चौकटीमध्ये आणणे खूप गरजेचे आहे.मात्र  असे होताना कधी दिसून येत नाही.याचे काही कारणे आहेत.त्यापैकी एक असे की, गुलाम कोण आणि गुलामला जाणीव करून देणार  कोण? या दोन वादामध्ये अनेकजण गुरफटलेले दिसून येतात.आणि मग सुरु होतो, तो समाजकारणातून राजकारणाचा आरसा. आरसा इतका बेमालूम  खोटा असतो की, त्याचे नेतृत्व करणारे अनेक जण अन्याय होण्याची वाट बघतात,आणि मग ते, न्यायासाठी सरकारी कलेक्टरचा उंबरा झीजवतात.

 फार पूर्वी कलेक्टर कचेरी ही तालुका दरबारी असते एवढंच लोकांना माहीत होतं.त्यावेळी गावकुसाबाहेरचे गाव गाड्याच जीवन आणि जगणं, गाव गाड्यातच दिवसभर राबत होतं.

 मात्र काळ हा नेहमी बदलत असतो आणि बदललेला काळ आपणासाठी थांबत नसतो.त्यामुळे बदलत्या काळाच्या ओघात,

   कलेक्टर कचेरीचा उंबरा जिल्हा पातळीवरती न्याय मागण्यासाठी, तुडवू लागला आहे. यासाठी निमित्त चहाच आनं कलेक्टर ची पायरी निवेदनासाठी सतार उघडी ठेवली जाते. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील, शेजारील असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या समोरील, हिरव्या झाडांच्या सावलीखाली, अनेक न्यायिक चळवळीसाठी बैठका  झोडपडल्या जातात.नगरपालिकेच्या खर्चात बांधलेल्या गार्डनमध्ये  अशा बैठका घेऊन, अन्याया विरोधात एल्गार पुकारला जातो,भासवला जातो. सामाजिक न्यायाच्या समरसतेच्या अपेक्षेने आलेले कलेक्टरच्या पायरी वरती ची अनेक निवेदनाची प्रत ही, या गार्डन मधल्या हिरव्या झाडांना, अनेक वेळा चिकटवली जाते आणि अशी यादी देखील, आशा झाडांना  कैक वर्षापासून  चिकटून राहिलेली आहे. यातील अनेक निवेदनेही कलेक्टर ऑफिस च्या न्यायाच्या प्रतीक्षेत मध्ये आहेत. तर अनेक निवेदनांना, तुमच्या भावना सरकारी दरबारी कळवल्या असल्या चे जुजबी सरकारी भाषेतील उत्तर देखील मिळालेले आहे. गेले अनेक वर्ष बैठकीला जागा नसल्याने, या बागेतील हिरवीगार झाडे, कलेक्टर कचेरीच्या” न्यायिक” मागण्यांचे साक्षीदार आहेत.मात्र हा न्याय मागनेचा प्रकार “अन्याय” झाले त्यानंतरचा आहे. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या, अनेकांना न्याय मिळेल की नाही याबाबत, वर्षानुवर्षे अनेक काकडून केवळ आणि केवळ, आश्वासन व्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही. या अन्यायाला, संघटित बैठक नाही, विखुरलेल्या नेतृत्वामुळे नेमक्या प्रश्नांची उगलं करावी कशी? याबाबतचा निर्माण झालेला गोंधळ, पक्ष संघटना, समुदायांचे नेतृत्वाचे मागून होणारी वर्षानुवर्षाची फरपट बदलत्या काळाच्या ओघात, बागेतील हिरव्या झाडांना आणखीन जास्तीत जास्त निवेदने चिकटवली जाणार आहेत. शिकलेल्यांना नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नसल्यामुळे अनेकांची थांबलेली लग्न, नुकतीच हळद लागून पिवळी झालेली सासर वाशिन, सहा महिन्याच्या आत हळद पिवळी  होण्या अगोदरच, माहेरवाशिन झालेली असते, ती कायमचीच.पोराच्या शिक्षणासाठी काढलेला कर्जाचा डोंबाळा, बापजाद्यांन,काढलेल्या कर्जात गेलेल्या, सरकारी दरबारी कडून मिळालेल्या इनामी मुलकीपड जमिनी, आज अनेक श्रीमंत बागायतदारांचे मुळे फुलवत आहेत.बदल झाला तो इतकाच गावकुसाबाहेर असणाऱ्या त्या झोपडी तली वस्ती  ही, प्रधानमंत्री इंदिरा आवास योजने मधून दोन खोल्यांमध्ये बंदिस्त झाले इतकाच काय तो बदल.जे शिकले ते  स्थिर झाली. ते, शहर,उपनगराच्या,माळरानावर ती सिमेंट विटा च्या जंगलामध्ये’आई वडील’ वगळता आपल्या लेकरा बाळासह बंदिस्त झालीत. त्यांच्यासाठी त्यांच्या बंगल्याची दारावरती, असणारे इलायची चित्रविचित्र आकाराचे कुत्रे, सांभाळणे  इतकीच काय ती त्यांची जिंदगी सुवर्णमय झाली.

पुढारलेला पुढे गेला, आणि गावकुसाबाहेर न पुढारलेला तसाच गावकुसाच्या, अंतरी मध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत, वर्षानुवर्षे ताटकळत बसला आहे.विचारवंत आणि सामाजिक न्याय  हा मानधनी विचारवंतांचा पोटापाण्याचा उद्योग बनून राहिला आहे. प्रश्नांचा  कोंडाळा निर्माण झाला आहे. समाजाच्या विकासासाठी, सामाजिक मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, ज्या वेगाने, विकासाचे “अर्थकारण फिरायला पाहिजे होते गेली सत्तर वर्षे त्या, विकास नावाच्या “अर्थकारनाचे चाक” महाभारतातील  युद्धा तल्या शापित,  रतासारखे रुतून बसले आहे.या रुतलेल्याअर्थकारणाच्या रतातील चाक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. किंबहुना ते अधिकाधिक खोलवर रूतावे यासाठी, विखुरलेल्या  टोळीतील असंघटित टोळक्यांना पुढे आणले जाते व त्यांना संघटित विचारांचे स्वरूप दिले जाते. अशी, कैक टोळकी उदंड झालीत. ज्यांचा एक पाय कायमच गल्लीत असतो मात्र दुसरा पाय हा नेहमी, अखिल भारतीय संघटना मंत्री म्हणून दिल्लीमध्ये असतो. या,आणि अशा अनेकांचा खरपूस समाचार घेण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.यांच्याकडे कोणतीही विचारांची मात्रा नाही, अर्थकारणाचे काडीचे ज्ञान नाही, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ची लागणारी व्यवस्थापनातील कौशल्यता यांचे जवळ अजिबात नाही.

मराठा समाजाच्या “डोळस पुढाऱ्यांनी” उभारलेली सहकाराची पाळेमुळे, साखर कारखानदारीचे अर्थकारण, सहकारी बँका पतपेढ्या यांचे अर्थकारण आणि यातून पिढ्यानपिढ्या साठी दिला गेलेला रोजगार, हा उपाशीपोटी दिल्या जाणाऱ्या न्यायिक मागणीच्या निवेदनाचे कलेक्टर कचेरीच्या पायरी वरती अंतर्मुख, करणारा आहे. दसरा चौकात समोरील असलेल्या परसबागे तील हिरव्या झाडांना चिकटवलेली अनेक निवेदने ही न्यायाच्या प्रतीक्षेत आवासून बघताहेत वर्षानुवर्षे, कारण त्याला नेतृत्व हे डोळस नाही याची जाणीव झाली आहे. अन्याय झाल्यानंतर न्यायाची मागणी करणारी आशा टोळक्याच्या प्रमुखांची दखल खऱ्या अर्थाने घ्यावी लागणार आहे कारण असे पुढारी आमचे वैरी आहेत.

 

    लेखक श्री तानाजी सखाराम कांबळे.

      मोबाईल नंबर 80 80 53 29 37.

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *