Getting your Trinity Audio player ready...
|
कडगाव प्रतिनिधी समीर मकानदार : कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
अशा परिस्थितीत अध्यक्ष दयानंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड प्रतिष्ठान ने पुढाकार घेऊन अगदी अल्पकालावधीत शिबिराचे आयोजन करत रक्तदात्यांना आवाहन केले त्यास १३० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून भरभरून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत, एक वेगळा इतिहास नोंदवला.
सर्व रक्तदात्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मास्कचा वापर करून सहभागी होत , रक्तदान सारखे पवित्र दान देण्याचे कार्य केले.
भुदरगड प्रतिष्ठान ने आता पर्यंत यशस्वीरीत्या तीन वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे २०१८ साली दिंडेवाडी येथे मग २०१९ साली ऐतिहासिक किल्ले भुदरगड येथे, तर या वर्षी कडगाव येथे शिबीर आयोजित केले होते.
शिबिरामध्ये जीवनधारा रक्तपेढी प्रमुख प्रसाद बिंदगे यांनी सहभाग घेत आपल्या टीमसह रक्तसंकलन केले.
रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही. रक्तासारखी बाब ही गरजवंताला कोणत्याही दुकानात अथवा मॉल मध्ये मिळत नाही. तर ती मानवाच्या शरीरातूनच मिळत असते. याकरिता अशा रक्तदान सारख्या उपक्रमामध्ये मानवाने सहभाग घेतला पाहिजे , असे प्रतिपादन भुदरगड प्रतिष्ठान चे अध्यक्ष दयानंद भोईटे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना भोईटे म्हणाले की, भुदरगड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्घ असून आगामी काळात पश्चिम भुदरगड मध्ये समाजाच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवणार असून सर्व युवा वर्गाने सहकार्य करावे , असे आव्हान केले.
शिबिराचे उदघाटन सरपंच दीपक कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसरपंच सुभाष सोनार, तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर चे संचालक नाथाजी पाटील, बळीराजा करीअर अकॅडमीचे संस्थापक अजित जाधव, भाजपाचे बाजीराव देसाई, पत्रकार दीपक पाटील, मनसे चे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र दबडे, NSUI चे प्रदेश महासचिव जयराज देसाई, सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री आदींनी शिबिरास सदिच्छा भेट दिली.
या शिबिरमध्ये विशेष परिश्रम प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष अशोक गुरव, राहुल देसाई(पोलीस), क्रीडाशिक्षक सचिन चौगले, अमोल चौगले, वजीर मकानदार, अशोक गुरव,
सचिन पाटील, पत्रकार राम सुर्वे, पंकज तोडकर, प्रविण भोईटे, उमेश चव्हाण, स्वप्नील पाटील, अजित कदम, विशाल, भोईटे, विजय भाट, धर्मवीर रौद्रशंभु, युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद ढेकळे, उपाध्यक्ष विशाल चौगले, सुशांत कदम, दयानंद कदम, रवी देसाई, विनायक देसाई, दत्तात्रय कदम, सचिन पाटील, श्री देसाई, प्रवीण देसाई, विशाल भोईटे, दिलीप डाकरे, सोनूदेसाई, विजय भाट, उमेश भोईटे,अजित भोईटे, अजित कदम, प्रवीण भोईटे, युवराज देसाई, विष्णू गुरव, देव दबडे, विजय देसाई आदी सहभागी झाले होते.
या वेळी युवा पत्रकार संघाचे भुदरगड तालुका अध्यक्ष समीर मकानदार,(कडगाव), यांनी युवा पत्रकार संघाच्या वतीने १५ ऑगस्ट पर्यंत १३० रक्तदात्यांना सन्मान पत्र देण्याचे घोषित केले.