Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शेंडा पार्क परि – सरात सुरू असलेल्या प्रयोगशाळेच्या बांधकामाची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज भेट देवून पाहणी केली.
यावेळी ऑडीटोरियमच्या बांधकामाची, प्रशासकीय इमारतीमधील अधिष्ठाता कार्यालय, परिषद सभागृह, ग्रंथालय याची पाहणी करून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी रूग्णसंख्या वाढली तर ग्रंथालयामध्ये खाटांची सोय करता येईल का? अशी विचारणा केली.
रुग्णालयासाठी शासनाकडून लवकरात-लवकर परवानगी घेवून पूर्णही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सद्या कार्यरत असणाऱ्या सर्व विभागांची पाहणीही त्यांनी यावेळी केली.
अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे म्हणाल्या, ग्रंथालयामध्ये ७० खाटांची सोय करता येईल, परंतु त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ऑक्सिजनची सोय करावी लागेल.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.
Share Now