मिरज प्रतिनिधी संतोष कुरणे : आज संपूर्ण मानव जातीला कोरोनापासून आणि त्याच्या होणाऱ्या महामारीपासून संघर्ष करत असताना अनेक भीषण गोष्टीशी सामना करावा लागत आहे, कोरोनासारख्या अशा भयंकर परिस्थिती मध्ये सामान्य नागरिकांची अवहेलना होत असताना दिसून येत आहे , अशीच एक भयंकर अशी परिस्थिती संजय गांधी झोपडपट्टी मिरज येथे पाहायला आली.
इथल्या झोपडपट्टी मध्ये शेकडो रहिवाश्यांनी झोपड्या टाकल्या आहेत, प्रचंड वर्दळ असलेला हा परिसर आणि अस्वच्छता दिसून येते.आणि अश्या भागातच कोरोनाच्या शिरकाव झाला होता. या संजय गांधी झोपडपट्टी मध्ये कोविड-१९ चे बरेच पेंशट होते, म्हणून इथला सर्व परिसर प्रतिबंधक क्षेत्र बनला आहे.
इथले रहिवासी हातावरच पोट असलेले, यांचा रोजगार हा त्या क्षेत्राच्या बाहेर येतो. इथल्या महिला या धुणं-भांडी करायला जातात, तरुण हमाली सारखी काम करतात, जेष्ठ वर्ग ही इथं असल्यामुळे तो ही बाहेर कामांसाठी रोजच्या रोजगाराच्या शोधत असतात. पण आता या घडलेल्या परिसरात कोरोनाच्या संबंध असावा, म्हणून संबंधित मालक इथल्या परिसरातल्या मजुरांना कामावर घेत नाहीत असे चित्र दिसून आले.
परिसरामध्ये कोरोना चा शिरकाव झाल्यामुळे आता कित्येक दिवस त्यांना उपसमारीशी तोंड द्यावे लागत आहे आणि अजून किती दिवस उपासमारी सोबत जगायचं , हा प्रश्न उभारताना दिसतो आहे. तिथल्या भोळ्या भाबड्या नागरिकांनी अगदी टोकाचा निर्णय घेतला आहे. अश्या भयंकर प्रश्नाकडे कोणाचं लक्षचं नाही , हे दिसून येत आहे. या प्रभागातले ४ नगरसेवक, प्रशासन, आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अशा भयंकर गोष्टीची दखलच घेतली नाही.
हा सगळा प्रकार लक्षात येताच वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रशांत (दादा)कदम, मिरज शहर अध्यक्ष आकाश मोरे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या गोष्टीबाबत दखल घेतली आणि या सामान्य जनतेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा इथल्या प्रस्थापित शासनाला आमच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल. असे वंचित युवक आघाडीने व दलित सेना यांनी बंड पुकारले आहे.