कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांसाठी कॉल सेंटर सुरू

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 10 Second

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रुग्णांना उपचार सुविधांची माहिती विनाअडथळा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद सांगली येथे  ०२३३ २३७४९००, ०२३३ २३७५९०० हे दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

 या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांना प्रशासनाने कोविड-१९ च्या उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेली हॉस्पिटल्स, त्यांचे संपर्क क्रमांक, त्याठिकाणी उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या बेडस्, ऍम्ब्युलन्स आदीबाबत सर्व ती माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

 याबरोबरच गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांशी प्रतिदिन संवाद साधून त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे का तसेच त्यांच्या आरोग्या बाबतची माहिती घेण्यासाठी ०२३३ २३७७९०० ,  ०२३३ २३७८९०० हे क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या क्रमांकावरून आलेले दूरध्वनी रुग्णांनी स्वीकारावेत व त्यावर विचारली जाणारी माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी, जेणेकरून गृह विलगीकरण यामध्ये असणाऱ्या रुग्णाला काही त्रास होत असल्यास पुढील उपचार त्वरित देता येतील,  असे आवाहनही केले आहे.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *