गांधीनगरमध्ये लोकसहभागातून कोविड सेंटर उभा करू : नावडकर

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 51 Second

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : गांधीनगरसाठी कोविड सेंटर उभा करू, पण त्यासाठी लोकसहभाग हवा,  असे करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी येथे स्पष्ट केले.

कोरोनाचे वाढते रुग्ण व कोविड सेंटर उभारणी संदर्भात गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत नावडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच सोनी सेवलाणी होत्या. गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांची प्रमुख उपस्थिती  होती.

 गांधीनगर परिसरात कोविड सेंटर होण्यासाठी शिवसेनेसह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. याशिवाय कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर ताबडतोब उपचार होण्यासाठी कोविड सेंटर गांधीनगरमध्ये त्वरित सुरू करावे, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर नावडकर म्हणाले, की जिल्हा प्रशासनातर्फे कोविड सेंटरसाठी व्हेंटिलेटर वगळता सर्व ती औषधे व डॉक्टर, कर्मचारी वर्ग पुरवला जाईल. मात्र लोक सहभागातून जागा, इमारत व बेडसह इतर साहित्य उपलब्ध करावे लागेल. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढे आले पाहिजे.

 दरम्यान, विशाल पहुजा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल पहुजा यांनी मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांच्याजवळ स्पष्ट केले कि, बेडसह जे साहित्य लागेल ते सर्व आम्ही देऊ. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. यानंतर गांधीनगरमधील काही जागा व इमारतींची नावडकर यांनी माहिती घेऊन पाहणी केली. व  उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ रश्मी माळगावकर यांनी गांधीनगरमध्ये लॉकडाऊन आणखी वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले.

गणेश देवकुळे व अशोक चंदवाणी यांनी काही सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कुलकर्णी, दीपक जमनानी, ज्योती सुतार,  माजी ग्रामपंचायत सदस्य धीरज तेहल्याणी, किशन वधवा व भारतीय सिंधू सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *