कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी व्यक्ती बसविण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहे .
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी हे रोल मॉडेल गाव असून गावची लोकसंख्या २० हजार पेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत असताना गडमूड शिंगी ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत. त्यातच गडमूडशिंगीचे आंबडेकरी चळवळीतील उमदे नेतृत्व म्हणून नंदकुमार गोंधळी यांच्याकडे आदराने पाहिले जाते.श्री.गोंधळी यांनी करवीर पंचायत समितीवर माजी उपसभापती म्हणून काम केले आहे. त्यांना प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. पंचायत राज विकास कार्यासाठी ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत व गावच्या विकास कार्यात झोकून देण्याची त्याची विकासक वृत्ती आणि कामे खेचून आणण्याची आक्रमक शैली त्याच्याकडे आहे.
लोक कार्यातील मनमिळाऊपणा यामुळे नंदकुमार गोंधळी सर्वांची पसंती मिळवत आहेत. त्याचीच प्रशासक पदावर नियुक्ती व्हावी, याची गावभर जोरदार चर्चा चालू आहे. ते गेेली ३० वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात व आबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. सर्व सामन्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते सतत आंदोलने ,मोर्चे करीत आले आहेत.
रेशन बचाव आंदोलन , इंधन दरवाढ आंदोलन , महागाई विरोधी आंदोलना मध्ये कायम सक्रीयपणे सहभागी आहेत . आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सतत मोर्चे आंदोलने नामांतर चळवळीपासून ते आजतागायत चळवळीशी नाळ जोडून आहेत . याच जोरावर त्यांना पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली व मिळालेल्या संधीचे सोने करीत उपसभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
त्यावेळी केलेली विकासाभिमुख कामे जनता आज ही विसरलेली नाही सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही ते उल्लेखनीय काम करीत आहेत. याबाबत त्यांना अनेक पुरस्कार ही मिळालेले आहेत . पिपल्स एज्युकेशन सोसायटी व वाघुड़े वसाहत येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन ही ते करीत आहेत . व या भागात अनेक विकास कामे केलेली आहेत . तसेच गावात बौद्ध , मातंग व चर्मकार समाजाची सार्वजनिक शेती असून, ती पिकवण्यासाठी ते सर्वांना प्रोत्साहन देत आहेत . तालुक्याच्या उपसभापती पदाचा असलेला व सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेता प्रशासक पदासाठी ग्रामस्थातून त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी अगदी २००४ सालापासूनच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी सहकार्य करीत आले आहेत . एक संघर्षशील नेतृत्व , प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेला व चळवळीमध्ये सक्रीय असणारे नेतृत्व नंदकुमार गोंधळी यांचे नावाबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरु आहे.
बंटी पाटील गटाची मुडशिंगी जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्ता असून गावातील बंटी पाटील गटात ते सक्रीय असून गटातील सर्व मार्गदर्शक व सर्वाशी प्रेमाचे आपुलकीचे संबंध आहेत . मनमिळावू स्वभावाचे आक्रमक व स्वाभिमानी नेतृत्व म्हणून नामदार बंटी पाटील हे नंदकुमार गोंधळी यांना संधी देतील अशी ग्रामस्थांना आशा आहे . नंदकुमार गोंधळी यांनाच संधी द्यावी , अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आप्पासो धनवडे . माधुरी कांबळे . दिलीप थोरात पिपल्स रिपब्लिकन पार्टी ,बौद्ध समाज मुडशिंगी . बंटी पाटील ग्रुप , जिल्हा उपाध्यक्ष पिपल्स रिपब्लिकन पार्टी जितेंद्र कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष युवा नेते श्रीमंत कांबळे यांच्या सह अन्य नागरिकडून केली जात आहे.