मिरज प्रतिनिधी नजीर शेख : गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर व दूध भुकतीला पन्नास रुपये प्रति किलो निर्यात अनुदान मिळावे, यासाठी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज बोलवाड येथे महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद भाऊ देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.प्राजक्ता कोरे, बोलवाड सरपंच सुहास पाटील, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चिवटे, महादेव कुरणे, गणेश माळी, पांडुरंग कोरे, किसान मोर्चा मनपा क्षेत्र अध्यक्ष शंकरांना इसापुरे, तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष संजय लिंबिकाई , बाबासाहेब आळतेकर,राजेंद्र नातू, मोहन वाटवे, धनंजय कुलकर्णी, गजेंद्र कुळळोली, जयगोड कोरे, संभाजी नाना मेंढे, ओंकार शुक्ल,ज्योती कांबळे, बाबगोंडा नाईक, रायाप्पा कागे, सुभाष खोत, संदीप कबाडे, सुमेध ठाणेदार, बाळासाहेब पाटील दीपक पाटील मोहन नागरगोजे निसार शेख युसुफ पटेल मनसुख पटेल श्याम कांबळे सुहास मगदूम स्वप्निल कांबळे बाळू कांबळे उपस्थित होते.
आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी शेतकर्यांच्या वतीने भावना व्यक्त करताना सांगितले की, २०१७ च्या दरम्यान ३२ रुपये प्रति लिटर गाईचे दूध खरेदी दर होता, मात्र आता अठरा वीस रुपये प्रति लिटर खरेदी दर आहे. पशुपालनासाठी लागणाऱ्या निविष्ठा, खाद्य, आरोग्यसेवा, वैरणीचे दर वाढत असताना, दुधाचे दर निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहेत.
दूध व्यवसाय हा महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत उलाढाल करणारा व त्यावर अवलंबून दूध उत्पादक शेतकरी, शेतमजूर,व इतर वितरण साखळीतील लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी दूध व्यवसाय टिकणे, बळकट होणे आवश्यक आहे. यासाठी भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
आंदोलनाचे संयोजन भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चिवटे व सरपंच सुहास पाटील यांनी केले.