Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे, मकरंद भाऊ देशपांडे, उपमहापौर आनंदा देवमाने, मोहन वणखंडे , नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, महादेव अण्णा कुरणे, संभाजी नाना मेंढे, ओमकार शुक्ल, गजेंद्र कुल्लोळी, युवा मोर्चा चे जयगोंड कोरे, राजाभाऊ देसाई, शंकर इसापुरे, भाजपा महिला आघाडी च्या ज्योती कांबळे, संदीप कबाडे,ईश्वर जनवडे, अनिल हरगे, भाजपा शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर व राजेंद्र नातू आदिसह अन्य मान्यवर भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now