गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या पोहोचली ३०५ वर… तर आज आणखी एका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील ५२ वर्षीय महिलेचा आज कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू झाला असून गांधीनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज ३ ऑगस्ट रोजी चारने वाढली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.
परिसरामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३०५ वर पोहोचली आहे. गांधीनगर परिसरातील मृतांची संख्या आजअखेर दहा झाली आहे.

गांधीनगरमध्ये एक तर उचगाव येथे सोमवारी दोन रुग्ण वाढले आहेत. गांधीनगरपैकी गडमुडशिंगी हद्दीत एक रुग्ण सापडला आहे. वळीवडे, चिंचवाड व वसगडे येथील रुग्णसंख्या स्थिर आहे.

दरम्यान, गडमुडशिंगीमध्ये गावभागात चार दिवसांपूर्वी मिळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे तिथे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायतीतर्फे अद्यापही सुरू आहे. गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवाना मुल्ला यांच्यासह आशा कर्मचारी घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्वेसह जनजागृती करत आहेत.

गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची सोमवार अखेरची संख्या अशी : गांधीनगर (१३२), वळिवडे (६३), उचगाव (५९), गडमुडशिंगी (२५), चिंचवाड (१६), वसगडे (१०) याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *