कृषी उत्पन्न बाजार समिती अशासकीय प्रशासकपदी सचिन घोरपडेंच्या निवडीने भुदरगड तालुका कॉंग्रेसला उभारी !

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 40 Second

कोल्हापूर : गोकुळ बचाव समितीचे सदस्य आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे भुदरगड तालुक्याचे सेनापती काॅग सचिन घोरपडे यांची कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी  निवड करण्यात आली आहे .

राज्याच्या पणन विभागाकडून घोरपडे यांना या पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र मंगळवारी दुपारी प्राप्त झाले आहे . या नियुक्तीच्या माध्यमातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला कार्यकर्त्यांचे अधिक बळ मिळावे , या साठी सतेज पाटील यांनी आपल्या गटाच्या भुदरगड तालुक्याचे सेनापती म्हणून आघाडीवर असणारे सचिन घोरपडे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सत्ताकेंद्र मिळवून दिल्याचे बोलले जाते . माजी आमदार महादेवराव महाडिक गटाच्या ताब्यात असलेल्या गोकुळ दूध संघासारखे सत्ताकेंद्र महाडिक गटाकडून खेचून घेण्यासाठी सतेज पाटील गटाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना भुदरगड तालुक्यातील काँग्रेसचे मास लीडर म्हणून ओळख निर्माण करणारे आणि तालुक्यातील दूध संस्थामध्ये वजन असणारे नेते म्हणून सचिन घोरपडे पहिल्यापासून सतेज पाटील गटासाठी कार्यरत राहिले आहेत . गोकूळ मधील महाडिक गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून सचिन घोरपडे आक्रमक रित्या महाडिक गटा विरोधात दूध संस्थांचे ठराव गोळा करणे, गोकुळ सत्ताधारी महाडिक गटाच्या कारभाराविरोधात आवाज उठवणे यामध्ये आघाडीवर राहिले आहेत .त्यांच्या ” सतेज निष्ठेचे” फळ म्हणून कृषि उत्पन्न बाजार समिती च्या अशासकीय प्रशासक पदाची धुरा सतेज पाटील यांच्या पुढाकाराने सचिन घोरपडे यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते .घोरपडे यांच्या निवडीने भुदरगड तालुक्यात सतेज पाटील गट अधिक भक्कम करण्याचे ही पालकमंत्री सतेज पाटील यांचे प्रयत्न असल्याचे समजते .सचिन घोरपडे यांच्या पत्नी सौ.वैशाली घोरपडे यांना यापूर्वी भुदरगड तालुका पंचायत समिती च्या सभापती पदाची संधी काँग्रेसचे नेते या नात्याने सतेज पाटील यांनी दिली होती .  सचिन घोरपडे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक  या नात्याने प्रथमच वैधानिक पद भूषविण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे .सचिन घोरपडे गोकुळ ची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत .यासाठी त्यांनी तयारीही केली आहे .पण कोरोना आपत्तीमुळे गोकुळ ची निवडणूक पुढे गेल्याने सचिन घोरपडे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक      म्हणून नियुक्ती करून आपल्या निष्ठावन्त कार्यकर्त्याला बळ देण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केल्याचे समजते .गोकुळ ची निवडणूक होईल ,तेंव्हा होईल ,तोपर्यंत आपल्या गटाला बांधून ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी खेळलेली ही चाल भुदरगड तालुक्यात सतेज पाटील गट भक्कम होण्यासाठी फलदायी ठरणार आहे .सचिन घोरपडे यांच्या निवडीने भुदरगड तालुक्यात सचिन घोरपडे आणि काँग्रेसच्या गटाला मात्र उभारी मिळाली आहे ,एवढे मात्र नक्की !

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *