सोशल मिडियामुळे मिळाला पत्रकाराला न्याय

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

सोशल मिडियामुळे मिळाला पत्रकाराला न्याय
दत्ता बिडकर पत्रकार गेली पंचवीस वर्ष हातकलंगले तालुक्यात पत्रकार म्हणून सर्वसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध लिखाण करून आपल्या बातम्या च्या माध्यमातून न्याय द्यायचे काम करतो.

Advertisements

अशा योगदान देणाऱ्या पत्रकाराला वाईट अनुभवास सामोरे जावे लागले.
बिडकर यांचे मोठा भाऊ पांडुरंग केरबा बिडकर यांना
श्वसनाचा त्रास होत होता म्हणून त्यांचा स्वॅब दिला.

त्यामध्ये सरकारी अहवाल निगेटिव्ह आला तर, एच,आर, सी, टी केला. आणि ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आले.
त्या नंतर दत्ता बिडकर ( पत्रकार) पेशंट भावाला घेऊन अनेक हॉस्पिटल मध्ये गेले.

पण बेड शिल्लक नाही कारण सांगून पेशंट ला ऍडमिट करून घेण्यास नकार दिला,
बिडकर यांनी ही बाब पालकमंत्री यांना सांगितली.
पालकमंत्री यांचे पी ए यांनी बिडकर यांना काही हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले बिडकर पेशंट भावाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले
पण तरीही हॉस्पिटल कडून प्रतिसाद मिळाला नाही.
आता पत्रकार बिडकर यांना पेशंट भावाला घरी नेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पत्रकार असून सुद्धा निराशा पत्करावी लागली म्हणून.
निराश मनाने सोशल मिडियाचा आधार घेत.
पत्रकार या नात्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे विनवण्या करण्याचे एक पोस्ट

” मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मला न्याय द्या…. माझ्या भावावर उपचार करा… त्याला व्हेंटिलेटर बेड द्या… माझ्या भावाचा जीव वाचवा….”

असे भावनिक होऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकली,
याची ताबडतोब प्रसारमाध्यमातील काही व्यक्तींनी, जिल्हाधिकारी, व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या
ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. व सहकार्य करण्यास विनंती वरून ताबडतोब याची दखल घेत
जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, डायमंड हॉस्पिटल चे डॉक्टर साई प्रसाद मिडियातील सहकारी मित्र यांच्या सहकार्याने कोल्हापूर मधील डायमंड हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ उपचार सुरू झाले. पत्रकार बिडकर यांची सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टची दखल घेत.जिल्हा माहिती कार्यालया कडून पत्रकार बिडकर यांच्या तर्फे वरील सर्वांच्या सहकार्याने माझ्या भावाला उपचार मिळाल्यामुळे आता माझ्या भावाची तब्येत सुधारत असल्याचे सर्वांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत सोमवारी टाकलेल्या सोशल मिडियावर भावनीक पोस्ट यापुढे वायरल करू नका ही विनंती.
असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सर्वांना कळविण्यात आले,

शेवटी सोशल मिडियाच्या आधारे, सोशल मिडियामुळे मिळाला पत्रकाराला न्याय असेच म्हणावे लागेल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *