खरतर गौरी-गणपती हा,सण, शहर उपनगर, खेड्यापाड्यातील सामान्य जनतेच्या अस्मितेचा!
संघटित होणारा व गोड गोड खाणारा, नवीन कपडे हमखास मिळवून देणारा, पिढीजात व पारंपारिक आहे!
यातील गणपती आगमन, आनंददायी हर्ष वेदक असे असते!
पावसाळ्याचे दिवस व शेजारील आजूबाजूची, हिरवीगार वनाची संपत्ती, काठीच्या पोकळ बांबूच्या तुकड्याला, गोल गोल, बंदुकी सारखी वाजणारी वाडवडला पासून ची तयार होणारी मेपटी, बंदुकीचा आवाज सारखे फटाफट वाजत असतात! गौरी-गणपतीच्या निमित्ताने गावातील देवालयामध्ये, फुगडी घालणार्या त्या, माहेरवाशिन गाव भेट झाल्यामुळे खूप आनंदित असतात. तर अनेक महिला ह्या गणपतीचे कान उघडण्यासाठी, लाटणे परातीवर, घासून घासून, आपल्या मनोकामना आपल्या गणेश बप्पा कडून पूर्ण करून घेतात. निरोपा समयी गावातल्या देवळांमध्ये, सर्व घरातील लहान गणेश मूर्ती एकत्रित केले जातात, व विसर्जनाचे वेळी, माहेर वाशीन यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू, लागतात व पुढच्या वर्षी लवकर या व आम्हालाही माहेरवाशिणी ला बोलवायला या असे म्हणू लागतात. माहेरवाशीण येताना आपल्या अंगाखांद्यावर खेळणारी पोरं देखील घेऊन आलेले असतात. अशा माहेरवाशिन ना आणायला जाणारा त्याचा भाऊराया, शिदोरी घेऊनच येऊ नये म्हणून चक्क, ग्रामपंचायत मल्हारपेठ तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर
यांनी एक नोटीस प्रसिद्ध केलेले आहे. या covid-19 च्या धक्क्यामुळे, अशा अनेक नोटिसा उद्या गावागावातून निघणार असल्यामुळे, गणेश बप्पा च्या स्वागतासाठी येणाऱ्या माहेरवाशीण यांनी चांगलाच धसका घेतला आहे. शीदोरीला बांधल्या जाणाऱ्या गरमागरम पोळ्या, करंज्या, लाडू,
गाव गाडा यांचे गावात, पहाटे पहाटे चोरून प्रवेश करणाऱ्या या माहेरवाशिणी च्या प्रतीक्षेत राहणार आहेत.
…………………………………………………………
लेखक. श्री. तानाजी सखाराम कांबळे.
खड्ड्यात गेली दुनियादारी! covid-19 चा धसका ! माहेरवाशिन ला ठसका!

Read Time:2 Minute, 52 Second