जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ त्यांची निवड..

राधानगरी प्रतिनिधी :अतुल पाटील

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ आज जाहीर झाले.
यात माजी आमदार के. पी. पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे.
मंडळाच्या सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेची शहानिशा करून नियुक्ती करावी,
असे आदेश कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीने जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.
बाजार समितीच्या संचालक मंडळाने नुकताच राजीनामा दिला. त्यानंतर येथे जिल्हा निबंधकानी प्रशासक म्हणून प्रदीप मालगावे यांची निवड केली होती. त्यांनी प्रशासक म्हणून काही दिवस बाजार समितीचा कारभार ही पाहिला आहे. अशातच समितीवर अशासकीय नियुक्ती केल्याची माहिती आली आहे.
नव्या संचालक अशासकीय प्रशासक मंडळात के. पी.पाटील मुख्य प्रशासक(मुदाळ, ता. भुदरगड ), प्रा.जालंदर पाटील(राशिवडे, ता. राधानगरी ), बी.एच.पाटील (वडणगे, ता. करवीर ), सचिन घोरपडे (वाघापूर, ता भुदरगड ), करणसिंह गायकवाड(सुपात्रे, ता. शाहूवाडी ), कल्याणराव निकम(वसरेवाडी, ता. भुदरगड ), सूर्यकांत पाटील(बामणी, ता. कागल ), राजेंद्र पाटील( सोळांकूर, ता. राधानगरी ), दिगंबर पाटील( दिंडनेर्ली, ता. करवीर ), अजित बाबुराव पाटील(माले, ता. करवीर ), अजित पांडुरंग पाटील(परिते, ता. करवीर ), सुजाता सावडकर(अणूर, ता. कागल ), दगडू भास्कर (कुडित्रे, ता. करवीर ) यांचा अशासकीय प्रशासक म्हणून निवड झाली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *