कोट्यवधींच्या महापालिका जागेवर अतिक्रमणाचा विळखा; विकासासाठी नगरसेवक विजय जाधव आक्रमक…

कोल्हापूर, ता. १२ : एलिक्झा पार्क परिसरातील महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या जागेवर होत असलेले अनधिकृत पार्किंग हटवून ती जागा सुरक्षित व विकसित करावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय जाधव यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सुमारे ७९४६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या जागेची बाजारमूल्ये ६० ते ७० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करत, येथे पीपीपी तत्वावर व्यावसायिक इमारत उभारून महापालिकेचे उत्पन्न वाढवावे, तसेच बॅडमिंटन कोर्ट, अभ्यासिका, आरोग्य केंद्र व आयटी कंपन्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात, अशी सूचना जाधव यांनी केली.

Advertisements

दरम्यान, आयुक्त डॉ. भारुड यांनी जागेची माहिती घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देत, तेथील अनधिकृत पार्किंग तातडीने हटवून जागा स्वच्छ करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *