प्रतिनिधी : जावेद देवडी
कोल्हापूर : शहर NSUI च्या वतीने अध्यक्ष अक्षय शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्य परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन अनोखा उपक्रम राबविण्यात आला,
गणरायाचे आगमन निर्विघ्न करूया अश्या प्रकारचा संदेश देत कोल्हापूरातील पापाची तिकटी येथील कुंभार गल्लीतील कुंभार बांधवांची आरोग्य तपासणी व शंका असणारया कुंभार बांधवांना डॉक्टरी सल्ला घेऊन तपासणी करून घेण्याविषयी जनजागृती करण्यात आले.
तसेच कुंभार बांधवांना आर्सेनिक अल्बम-30,व्हिटॅमिन सी च्या गोळ्या वाटण्यात आल्या
आणि त्या भागात कोरोना विषयी समुपदेशन करून कुंभार बांधवांमध्ये जागृती केली.
तसेच शहरातील विविध भागांतील रिक्षेवाले,मास्क विक्रेते,विविध दुकानदार यांना औषधांचे वाटप करून सुरक्षित राहण्याविषयी समुपदेशन केले.
सदर उपक्रमास पालकमंत्री ना. मा.सतेज पाटील साहेब,मा.आमदार ऋतुराज पाटील दादा,मा.आमदार चंद्रकांत जाधव अण्णा,महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.नगरसेवक तौफिक भाई मुल्लाणी व सामाजिक कार्यकर्ते मा.शिवानंददादा बनछोडे यांचे मार्गदर्शन लाभले, यावेळी सुशांत चव्हाण,संकेत जोशी,आशिष माने,सतेज पोलादे, सागर तांबे आदी उपस्थित होते.