कोरोना बाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी घेतला आढावा…

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 52 Second

कोल्हापूर : शिवाजी शिंगे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा आढावा आज महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.
महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी सध्या महानगरपालिका हद्दीमध्ये किती कोरोना पेशंट आहेत. त्यापैकी किती ऍ़क्टीव्ह व किती मयत झाले आहेत याबाबत आढावा घेतला. शहरामध्ये किती व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. गर्व्हमेंट व खाजगी दवाखान्यंामध्ये कोव्हीड केअर सेंटर येथे किती ऑक्सीजन बेड आहेत याची माहिती घेतली. कोव्हीड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा पुरेसा साठा आहे का. शिवाजी पेठ व राजारामपूरी येथे करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये किती पॉझीटिव्ह व निगेटिव्ह पेशंट आढळले आहेत. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग झाले आहे का. भांडार विभागाकडे पूरेसा औषध साठा आहे का. खोकल्याचे लाल औषधाचा साठा करून ठेवावा त्याचे परीणाम चांगले आहेत. कोव्हीड 19 साठी महापालिकेमध्ये वॉर रूमची सेवा उपलब्ध आहे. याबाबत सर्व सदस्यांना येथील कर्मचारी व कामकाजाची माहीती दयावी. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटल येथे सक्षम अधिकाऱ्यांमार्फत फिरती करून त्याचा अहवाल दयावा. शवगृह कधी पासून सुरू होणार आहे. सावित्रीबाई फुले येथे वरील मजल्यावर नॉन कोव्हीड रूग्णांसाठी वॉर्ड सुरू लवकरात लवकर सुरु करा. महापालिकेने नवीन ऍ़म्ब्युलन्स घेतल्या आहेत. त्या कार्यरत केल्या आहेत का. पंचगंगा स्मशानभूमी येथील गॅस दाहिनी व्यवस्थीत सुरू असलेबद्दल समाधान व्यक्त केले. स्मशान भूमीकडे शेणी व लाकडाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा. कोविडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेगवेगळया योजना जाहीर झाल्या आहेत. याची महापालिकेमध्ये अमंलबजावणी सुरू केली आहे काय. सध्या महापालिकेच्या किती शववाहीका उपलब्ध आहेत. आमदार ऋतूराज पाटील व आमदार चंद्रकांत जाधव हे नवीन शववाहीका देणार आहेत त्याची पुढील कार्यवाही सुरू केली आहे का. ऑक्सिमीटर वापर करण्यासंबंधी नागरीकांमध्ये जनजागृती करा अशा सुचना दिल्या.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरामध्ये पेशंटची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका अधिक खबरदारी घेऊन काम करत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अधिक लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. सर्वांनी नियोजनबद्द काम केले तर नक्कीच कोरोना कंन्ट्रोलमध्ये येईल. सध्या शहरामध्ये 4853 पैकी 2136 ऍ़क्टीव्ह रुग्ण आहेत. काल अखेर 114 मयत झाले आहेत. खाजगी दवाखान्यामध्ये 43 व्हेंटिलेटर आहेत. त्याचबरोबर सीपीआर व डी वाय पाटील हॉस्पीटल येथेही व्हेंटिलेटर आहेत. कोव्हीड केअर सेंटरमध्ये सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. ते संपल तसे लगेच भरुन आणले जातात. शिवाजी पेठ व राजारामपूरी येथे 4 हजार कुटूंबांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. त्यामधील 25 जणांचे स्वॅब घेतले आहेत. त्यामधील 3 पॉझीटिव्ह आले आहेत. महापालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची युपीएससी येथे ऍ़न्टिंजन टेस्ट व स्क्रिनींग करुन घेत आहे. औषध साठा पुरेसा आहे. वॉर रुम येथे 0231 ʊ 2542601 या नंबरवर हॉस्पीटल बेड बाबतची माहिती मिळते. शवगृह दोन दिवसात सुरु करीत आहे. 4 महापालिकेच्या व 2 खाजगी शववाहिका असून आणखीन नविन 4 शववाहिका खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे असे सांगितले.
यावेळी गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक अशोक जाधव, उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ.कृष्णा केळवकर, प्रशासन अधिकारी शंकर यादव व इतर अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *