ऑक्सिजन उत्पादक कंपन्या अधिग्रहीत करा, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : जिल्ह्यातील पाचही ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यान्वये अधिग्रहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

या पाचही कंपन्यांनी वैद्यकीय कारणासाठी आॕक्सीजनचा पुरवठा करावयाचा असून, अन्य कारणासाठी तसेच इतर जिल्ह्यात पुरवठा करण्यासाठी एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांची परवानगी घ्यायची आहे.
परवानगी न घेतल्यास अशा कंपन्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला आहे.
याबाबत आज रात्रीपासूनच कंपन्यांच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्तीची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Advertisements

 कोल्हापूर ऑक्सिजन कागल, के नायट्रोजन प्रा लि-शिरोली, महालक्ष्मी गॅसेस यड्राव इचलकरंजी, देवी इंडस्ट्रीयल गॅस गोकूळ शिरगाव आणि चंद्रा उद्योग शिरोली अशा पाच ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आहेत.
या पाचही कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज दिले असून, एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी श्री. इंगळे यांच्या नियंत्रणाखाली तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही दिली.

वैद्यकीय कारणासाठी आॕक्सीजनचा पुरवठा या कंपन्यांकडून होतोय का ? याची पाहणी हे कर्मचारी करतील. यासाठी आज रात्रीपासूनच या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना दिली आहे.
जिल्ह्यातील तसेच अन्य उद्योगांसाठी पुरवठा करण्याची परवानगी श्री इंगळे यांच्याकडून घ्यावी लागेल अन्यथा अशा कंपन्यांवर गुन्हे दाखल केले जातील, या कंपन्यांवर याबाबतचे आदेश उद्या बजावण्यात येतील.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *